ढिसाळ विकेटकिपिंग करणाऱ्या ऋषभला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 8 विकेट्सने बांगलादेशचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताचा विजय झाला असला, तरी आपल्या विकेटकिपिंगमुळे ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या लिटन दास आणि मोहम्मद नाइम या सलामी जोडीने बांगलादेशला चांगली सुरूवात करून दिली. 6 व्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतने लिटन दासला आउट करण्याची संधी एका छोट्याशा चुकीमुळे गमावली.

https://twitter.com/barainishant/status/1192446051493597184

चहलच्या गोलंदाजीवर लिटन दास फलंदाजी करताना क्रीजच्या खूप पुढे निघून आला होता. पंतने घाईघाईत  त्याला स्टंपिंग करत माघारी देखील धाडले. मात्र पंतच्या अति उतावळेपणामुळे लिटन दासला जीवनदान मिळाले. स्टंपिग करत असताना पंतने चेंडू स्टंपच्या पुढे येऊन पकडला होता. त्यामुळे अंपायरने हा नोबॉल ठरवत लिटन दासला नोट आउट दिले.

https://twitter.com/msd_junior/status/1192447785242517504

विकेटकिपिंग करताना केलेल्या बेसिक चुकीमुळे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली. नेटकऱ्यांनी त्याची तुलना महेंद्र सिंह धोनीशी करण्यास सुरूवात केली.

मात्र एकदा केलेली चूक पुन्हा न करता पंतनेच 8 व्या ओव्हरमध्ये लिटन दासला 29 धावावंर रन आउट केले. त्यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये देखील पंतने सौम्या सरकारला जबरदस्त स्टंपिंग करत आउट केले.

Leave a Comment