पुण्यातील या प्रसिध्द हॉटेलच्या वॉशरूममध्ये आढळला छुपा कॅमेरा, ट्विटरवर आक्रोश

पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळल्याने सोशल मीडियावर मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी एका महिलेने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये तिला लेडीज वॉशरूममध्ये लपवलेला कॅमेरा कसा सापडला हे सांगितले होते. तिच्या या स्टोरिजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणातील आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महिलेने आपल्या स्टोरिजमध्ये सांगितले की, ती हिंजेवाडी येथील बीहाईव्ह कॅफेत गेली होती. तेथील वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळला. याविषयी कॅफे मॅनेजमेंटला तक्रार केल्यावर त्यांनी आम्हाला थोड्यावेळ बाहेर थांबण्यास सांगितले व काही वेळातच त्यांनी लपून तेथील कॅमेरा काढला.

एका युजरने केलेल्या ट्विटनुसार, हॉटेल मॅनेजमेंटने त्यांना लाच देण्याचा देखील प्रयत्न केला आणि झोमॅटोवर टाकलेला रिव्ह्यू देखील डिलीट केला.

पुणे पोलिसांनी देखील या ट्विटला उत्तर देत तक्रार नोंदवण्यास सांगितले.

या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री रिचा चढ्ढाने देखील पुणे पोलिसांना टॅग करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणावर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळाल. एका युजरने केलेल्या ट्विटनुसार, बीहाईव्ह हॉटेलने या प्रकरणाबद्दल माफी देखील मागितली.

Leave a Comment