अँटी-व्हायरसच ठरत आहेत 190 कोटी स्मार्टफोनसाठी धोकादायक

स्मार्टफोन युजर्ससाठी एक नवीन धोका समोर आला आहे. अँटी-व्हायरस अ‍ॅपशी संबंधित हा धोका आहे. अनेक युजर्स स्मार्टफोनला मालवेअर आणि व्हायरसपासून वाचवण्यासाटी अँटी-व्हायरस अ‍ॅपचा वापर करतात. मात्र हेच अँटी-व्हायरस धोकादायक ठरत आहेत.

या धोकादायक अँटी व्हायरसचा शोध प्रायव्हेसी आणि सिक्युरिटी रिसर्च कंपनी VPNPro ने लावला आहे. हे प्रकरण यासाठी गंभीर आहे, कारण अँटी-व्हायरस जगभरातील 190 कोटी स्मार्टफोन्समध्ये आहे.

या सिक्युरिटी रिसर्च कंपनीनुसार, गुगल प्से स्टोरवर असे 10 अ‍ॅप्स आहेत, जे फोनचा एक्सेस घेऊन, मालवेअर आणि व्हायरस पसरवतात. हे अँटी-व्हायरस युजर्सच्या डिव्हाईसवर लक्ष ठेवतात.

डिलीट होण्यासाठी मागतात पैसे –

हे अँटी व्हायरस युजर्सचा खाजगी डेटा जमा करतात. यातील काही अ‍ॅप्स असे आहेत, जे डिलीट होण्यासाठी पैसे मागतात. काही दिवसांपुर्वीच गुगलने असे 5 अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स 50 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले होते.

या धोकादायक अ‍ॅप्समध्ये क्लिन मास्टर सारख्या लोकप्रिय अ‍ॅपचा देखील समावेश आहे. याशिवाय व्हायरस क्लिनर, अँटी व्हायरस फ्री, 360 सिक्युरिटी, सुपर क्लिनर अशा अनेक अ‍ॅप्सचा समावेश आहे. तुमच्या फोनमध्ये देखील असे अ‍ॅप असेल तर त्वरित डिलीट करा.

रिसर्च कंपनीने सांगितले की, हे अँटी-व्हायरस स्मार्टफोनमध्ये घुसून फोन कॉल रेकॉर्ड करतात व लोकेशनवर देखील लक्ष ठेवतात. युजर्सचा डेटा विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात.

Leave a Comment