या कंपनीने भारतात लाँच केली 60 हजार रूपयांची इलेक्ट्रिक स्कूटर

ओकिनावाने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा लाइट लाँच केली आहे. भारतात या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 59,900 रुपये आहे. खास महिला आणि युवकांसाठी या स्कूटरचे डिझाईन करण्यात आले आहे.

स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी काढता येऊ शकते. ओकिनावा लाइट स्कूटरच्या बॅटरी आणि मोटारवर 3 वर्षांची  वॉरंटी आहे.

(Source)

फीचर्सबद्दल सांगायचे तर, यामध्ये फुल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, तीन रायडिंग मोड्स (लो, हाय आणि एक्सीड) आणि डिस्प्लेवर मोठे स्पीडोमीटर व टेकोमीटर, पूश बटन स्टार्ट/स्टॉप सारखे फीचर्स मिळतात. स्टार्ट/स्टॉप बटनाच्या बाजूला स्टोरेज कम्पार्टमेंटसोबत यूएसबी चार्जर देण्यात आले आहे.

या स्कूटरमध्ये 250 वॉट BLDC मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 40 वोल्ट, 1.25KWH लीथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी एंटी-थेफ्ट मॅकेनिझ्मसोबत येते. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

(Source)

फूल चार्जमध्ये ही स्कूटर 50 ते 60 किमी अंतर पार करू शकते. फूल चार्ज होण्यासाठी स्कूटरला 4 ते 5 तास लागतात. यामध्ये एल्युमिनियम एलॉय व्हिलज देण्यात आले आहेत. याशिवाय हजार्ड फंक्शन, इंबिल्ट रायडर फुटरेस्ट आणि LED स्पीडोमीटर , LED हेडलाइट, LED विंकर्स, स्टाइलिश LED टेललॅम्प्स, ऑटोमेटिक इलेक्ट्रॉनिक हँडल, सेल्फ स्टार्ट पुश बटन स्कूटरमध्ये मिळेल.

Leave a Comment