मर्सिडीजची शानदार एमपीव्ही लाँच, अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील आहे ही कार

जर्मनीची लग्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने भारतीय बाजारात आपली नवीन मल्टी पर्पज व्हीकल (एमपीव्ही) व्ही-क्लास इलाइट लाँच केली आहे. ही कार भारतात या आधी लाँच करण्यात आलेल्या ‘व्ही-क्लास एक्सप्रेशन’ आणि ‘व्ही-क्लास एक्सक्लूझिव्ह’चे अपग्रेड व्हर्जन आहे.

(Source)

या शानदार एमपीव्हीची एक्स शोरूम किंमत 1.10 कोटी रूपये आहे. सहा सीटर कारमध्ये बीएस-6 इंजिन देण्यात आलेले आहे. याचबरोबर क्लायमेट कंट्रोल, 15 स्पीकर, एरियल विंडो यासारख्या सुविधा देखील यात आहेत. कारमध्ये रेफ्रिजेरेटर कंपार्टमेंटसोबत सेंट्रल कंसोल, पॅरानॉमिक स्लायडिंग रूफ (ऑप्शनल) आणि इजी पॅक टेलगेट देण्यात आले आहे. या एमपीव्हीमध्ये सरकारने 17 इंच एलॉय व्हिल दिले आहेत व यात 18 इंच एलॉय व्हिल पर्याय देखील मिळेल.

(Source)

V-Class Elite स्टील ब्लू, सेलेनाइट ग्रे, ग्रेफाइट ग्रे, डार्क ऑब्डियन ब्लॅक मॅटेलिक, कॅव्हेनसाइट ब्लू मॅटेलिक, रॉक क्रिस्टल व्हाइट मॅटेलिक आणि ब्रिलियंट सिल्वर मॅटेलिक रंगात उपलब्ध आहे.  मर्सिडीजने यामध्ये सहा एअरबॅग्स, अंटेनशन असिस्ट, 360 डिग्री कॅमेऱ्यासोबत एक्टिव पार्किंग असिस्ट सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. व्ही-क्लासमध्ये 1950 सीसीचे इंजिन मिळेल. जे 6300 आरपीएमवर 120 किलोवॉटची पॉवर आणि 4500 आरपीएमवर 380 एनएमचा टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 11 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडते.

(Source)

बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील ही एमपीव्ही आहे. व्ही क्लास Expression Long wheelbase ची एक्स शोरूम किंमत 68.40 लाख रुपये आहे. तर टॉप अँन्ड व्ही-क्लास Exclusive Extra Long wheelbase ची किंमत 81.90 लाख रूपये आहे. याच्या लाँग व्हीलबेस व्हर्जनमध्ये 6 सीट येतात. तर एक्स्ट्रा लाँग व्हर्जनमध्ये 7 लोक बसू शकतात.