या ऑफर अंतर्गत केबल कनेक्शनशिवाय पहा 150 चॅनेल

भारतीय बाजारात आता केवळ मोबाईल रिचार्ज प्लॅनच नाही तर टिव्ही चॅनेल पॅकसाठी देखील कंपन्यांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. प्रत्येक डीटीएच कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अगदी स्वस्तात मस्त प्लॅन आणत आहे. आता यातच रिलायन्स जिओने खास आयपीटीव्ही ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत टिव्ही युजर्स विना टिव्ही कनेक्शनचे 150 चॅनेल बघू शकतील. जिओने आपल्या ग्राहकांना 4के सेटटॉप बॉक्स देण्यास आधीच सुरूवात केली आहे.

कंपनीने ही ऑफ अशा युजर्सना दिली आहे, ज्यांनी प्रीव्यू प्लॅनमधून मायग्रेट होऊन पेड प्लॅन निवडला आहे. या ऑफरद्वारे युजर्स केबल कनेक्शन शिवाय 150 चॅनेल्स बघू शकतील. यानंतर जिओच्या ग्राहकांना कोणत्याही लोकल केबल ऑपरेटर्सचे कनेक्शन घेण्याची गरज पडणार नाही.

कंपनीने जिओ फायबर लाँच करताना सेटटॉप बॉक्ससोबत जिओ टिव्ही अॅप देखील देण्यात येईल असे सांगितले होते, मात्र युजर्सला सेटटॉप बॉक्समध्ये जिओ टिव्ही अप देण्यात आलेले नाही. युजर्सला चॅनेल्स बघण्यासाठी फायबर कनेक्शन सोबत केबल कनेक्शन देखील खरेदी करावे लागणार आहे.

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्स सोबत जिओ टिव्ही प्लस फीचर देखील देईल. टिव्ही अॅपमध्ये ग्राहकांना लाईव्ह टिव्हीचा देखील पर्याय मिळेल. तर दुसरीकडे युजर्सला 849 रूपयांवरील प्लॅनमध्ये ओटीटी स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.

Leave a Comment