ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी हा पठ्ठ्या बनवत आहे स्वतःचे हेलिकॉप्टर

गाड्यांची वाढणारी संख्या ही मोठी समस्या आहे. अनेक देशात यापासून सुटका करण्यासाठी उपाय शोधले जात आहे. काही ठिकाणी तर गाड्यांच्या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी हवेत उडणाऱ्या टॅक्स्या देखील सुरू झाल्या आहेत. याच ट्रॅफिकच्या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी इंडोनेशियामधील 42 वर्षीय जुजुन जुनैदी स्वतःचे हेलिकॉप्टर बनवत आहे. स्वतःचे हेलिकॉप्टर बनवून ही व्यक्ती जकार्ताच्या ट्रॅफिकपासून सुटका मिळवणार आहे.

जुनैदी जकार्ता येथे एका ऑटो रिपेअर शॉपमध्ये काम करतात. ते मागील एक वर्षांपासून घराच्या मागील बाजूला हेलिकॉप्टर तयार करत आहे. या हेलिकॉप्टरची लांबी 8 मीटर आहे.

जुनैदी म्हणाले की, देवाची कृपा असेल तर या वर्षाच्या अखेर हेलिकॉप्टर तयार होईल व 2020 मध्ये हेलिकॉप्टरचे उड्डाण घेईल. आतापर्यंत त्यांनी या प्रोजेक्टवर 1 लाख 53 हजार रूपये खर्च केले आहेत.

हेलिकॉप्टर बनविण्यासाठी त्यांनी कोणतीही ट्रेनिंग घेतलेली नाही. ऑटो रिपेअर शॉपच्या अनुभवावरूनच ते हे हेलिकॉप्टर बनवत आहेत.

Leave a Comment