आता सेल्फी व्हिडीओद्वारे उघडा फेसबुक अकाऊंट

जगातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा वापर करते. आपल्या युजर्ससाठी फेसबुक देखील नवनवीन फीचर आणत असते. आता फेसबुक लवकरच एक वेगळे फीचर युजर्ससाठी आणण्याच्या तयारीत आहे. युजर्सला येणाऱ्या फीचरद्वार अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी सेल्फी व्हिडीओ रजिस्टर करावी लागेल.

फेसबुकच्या या फीचरद्वारे युजर्सला व्हेरिफिकेशनसाठी सेल्फी व्हिडीओ काढावा लागेल. याद्वारे स्पष्ट होईल की, युजर्स मनुष्य आहे, रोबोट नाही. कंपनीचे हे फीचर सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला आपले डोळे योग्य लेव्हलला आणावे लागतील. त्यानंतर गोलाकार फ्रेममध्ये स्वतःचा चेहरा फिट बसवावा लागेल. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर युजर्स व्हिडीओद्वारे आपले अकाऊंट उघडू शकतात.

फेसबुक आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर लाँच करत आहे. काही दिवसांपुर्वीच कंपनीने डेटिंग फीचर देखील सुरू केले आहे. याशिवाय फेसबुकने आपला नवीन लोगो देखील लाँच केला आहे.

Leave a Comment