व्हीव्हीएस लक्ष्मणसाठी हा चहा विक्रेता का आहे ‘प्रेरणास्त्रोत’ ?

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्विट करत एका व्यक्तीला प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. लक्ष्मणने आपल्या ट्विटमध्ये कानपूरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद महबूब मलिक यांच्याबद्दल सांगितले. लक्ष्मणने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, मोहम्मद यांचे कानपूरमध्ये एक छोटीसे चहाचे दुकान आहे. या दुकानाद्वारे होणाऱ्या कमाईचा 80 टक्के हिस्सा ते 40 मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात.

व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी चहाच्या दुकानावर बसलेल्या मोहम्मद मलिक यांचा फोटो शेअर करत लिहिले की, ते खरचं एक प्रेरणास्त्रोत आहेत.

मोहम्मद महबूब मलिक हे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील शारदा नगर येथे गरीब मुलांसाठी शाळा चालवतात. ही शाळा 2015 मध्ये सुरू झाली. या शाळेत विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, पुस्तके स्टेशनरी देखील दिली जाते.

व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले असून, आतापर्यंत याला 24 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. अनेक युजर्सनी मोहम्मद यांचे कौतूक केले.

ट्विट व्हायरल झाल्यानंतर मोहम्मद यांनी सांगितले की, त्यांचे लहानपण खूप गरिबीमध्ये गेले आणि त्यांनी केवळ हायस्कूलपर्यंतचेच शिक्षण पुर्ण केले. त्यामुळे इतरांना शिक्षण मिळवण्यासाठी ते मदत करतात.

 

Leave a Comment