या मंदिरांमधील देवाला अर्पण केला जात नाही प्लास्टिकमधील प्रसाद

सिंगल यूज प्लास्टिकपासून सुटका मिळविण्यासाठी सरकारचा प्रयत्न भलेही यशस्वी अथवा अपयशी झाला असो, मात्र उत्तर प्रदेशच्या प्रमुख तीर्थ स्थळांवर मागील अनेक वर्षांपासून प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ, संकट मोचन मंदिर, अयोध्यातील रामलला विराजमान, हनुमान गढी आणि मथुरा-वृंदावनमधील रंगनाथजी, बांके बिहारीसोबत अनेक मंदिरात प्लास्टिक पॅकिंग आणि पिशव्यांमध्ये आणलेला प्रसाद पुजारी देवाला अर्पणच करत नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वीच सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या अनेक मंदिरांमध्ये प्लास्टिकच्या वापरावर आधीपासूनच बंदी घालण्यात आलेली असून, परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

मथूरेतील रंगनाथ मंदिर मंदिराचे अध्यक्ष अनघा श्रीनिवासन यांनी सांगितले की, मंदिरात मागील 20 वर्षांपासून प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरातील किचनमध्ये देखील प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर केला जात नाही. दक्षिण शैलीत मंदिरात प्लास्टिकला अशुध्द मानले जाते.

याचप्रमाणे वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, संकट मोचन मंदिर आणि अयोध्येतील रामलला व हनुमानगढी मंदीरात देखील प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई आहे. प्लास्टिकच्या वस्तू देखील मंदिरात घेऊन जाऊ दिले जात नाही. दूध आणि पाण्यासाठी देखील भाविकांना कागदाचे मोठे ग्लास दिले जातात.

Leave a Comment