अमेरिकेत भारतीय वंशाच्या चौघांनी राज्य-स्थानिक निवडणुकीत मिळवला विजय

अमेरिकेत मागील आठवड्यात पार पडलेल्या राज्य व स्थानिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना मोठे यश मिळाले आहे. भारतीय वंशाच्या गजला हाश्मी वर्जीनिया राज्यात निवडणूक जिंकणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत. तर बराक ओबामा यांच्या काळात व्हाइट हाउसमध्ये सल्लागार राहिलेले सुभाष सुब्रह्मण्यम हे देखील वर्जीनियामधून निवडून आले आहेत.

या दोघांशिवाय कॅलिफोर्नियातील सॅन फ्रँन्सिस्कोमधून मनो राजू आणि नॉर्थ कॅरोलिनातील शार्लोट सिटीमधून डिंपल अजमेरा यांनी स्थानिक निवडणुकीत विजय मिवला आहे.

गजला यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून वर्जीनियाच्या 10व्या सिनेट डिस्ट्रिकटमधून विजय मिळवला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ग्लने स्ट्रुर्टेवांट यांचा पराभव केला. या विजयानंतर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन यांनी देखील गजला यांना शुभेच्छा दिल्या.

गजला यांचे कुटूंब 50 वर्षांपुर्वी भारत सोडून अमेरिकेत गेले होते. निवडणूक लढवण्याआधी त्या रेनॉल्ड्स कम्युनिटी कॉलेजमध्ये फाउंडिंग डायरेक्टर होत्या.

सुभाष सुब्रह्मण्यम यांनी राज्याच्या हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हसमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. सुभाष यांची आई 1979 मध्ये बंगळुरू सोडून अमेरिकेला गेल्या होत्या. सुभाष हे ओबामा यांचे सल्लागार देखील होते.

Leave a Comment