लवकरच बंद होणार ट्विटरचे रिट्विट ऑप्शन ?


काही महत्त्वाचे बदल सोशल मीडिया क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावी माध्यमांपैकी एक असलेल्या ट्विटरमध्ये होण्याची शक्यता आहे. ट्विट आणि रिट्विटच्या नियमांमध्ये कंपनी पुढील वर्षापासून बदल करण्याच्या विचारात असून याबाबतची माहिती ट्विटरचे उपाध्यक्ष डेंटली डेव्हिस (डिझाइन अँड रिसर्च ) यांनी दिली आहे. लवकरच एक छळवणूक विरोधी फीचर (Anti-Harassment Features) युजर्सच्या सेवेत मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर दाखल करण्याची शक्यता आहे.


२०२० मध्ये ज्या फीचर्समध्ये बदल किंवा जे नवे फीचर्स आणायचा विचार आहे, अशी एक यादी डेंटली डेव्हिस यांनी शेअर केली आहे. तसेच, युजर्सकडून त्यांनी शिफारसी देखील मागवल्या आहेत. यानुसार, युजरला चांगला अनुभव मिळावा यासाठी युजरच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही त्यांच्या संवादाचा भाग बनू शकणार नाहीत. लवकरच युजर्स स्वत: ठरवू शकतात की इतर युजर्स त्यांचे ट्विट रिट्विट करु शकतात किंवा नाही, किंवा एखाद्या खास ट्विटला रिट्विट करण्याचा पर्याय बंद करणे. याशिवाय परवानगीशिवाय मेंन्शन करता न येणे, अशाप्रकारच्या फीचरबाबत कंपनी विचार करत आहे.

ट्विटरवर हे फिचर लाँच झाल्यावर रिट्विट आणि दुसऱ्या युजर्सना मेंन्शन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली जाणार आहे. या फीचरनंचर कोणत्याही कन्व्हर्सेशनमध्ये युजरच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांना सामील करु शकणार नाही. ट्विटरने यापूर्वीच राजकीय जाहिराती ट्विटरवरुन बंद करण्याची घोषणा केली आहे. ट्विटरवर 22 नोव्हेंबर पासून राजकीय जाहिराती दिसणार नाहीत.

Leave a Comment