चक्क सोने आणि हिऱ्यांपासून बनविण्यात आले टॉयलेट, किंमत कोटींच्या घरात

तुमच्याकडे प्रचंड पैसा आला तर तुम्ही काय कराल ? तुमचे उत्तर असेल अलिशान घर, लग्झरी गाड्या, महागडे घड्याळ अशा एकना अनेक गोष्टी खरेदी करेल. मात्र तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तुम्ही सोन्याचे टॉयलेट बनवाल का ? अर्थातच तुम्ही म्हणाल टॉयलेट आणि तेही सोन्याचे, बनवणार वेडाच असेल ? टॉयलेट सारख्या गोष्टीसाठी सोने का वापरेल ? मात्र हे घडले आहे. शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आलेले टॉयलेट सीटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्थातच हे टॉयलेट सीट वापरण्यासाठी नाही. यात बुलेटप्रुफ काचेचा वापर करण्यात आला असून, त्यावर 40,815 हिरे लावण्यात आलेले आहेत. हे सर्व हिरे 334.68 कॅरेट्सचे आहेत. हे टॉयलेट चायना इंटरनॅशनल इम्पॉर्ट एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.

खास गोष्ट ही देखील आहे की, सेनेटरी कंपनीने नाही तर ज्वेलरी ब्रँड कोरोनेटने हे टॉयलेट तयार केले आहे. या टॉयलेट सीटची किंमत तब्बल 8.52 कोटी रूपये आहे. ज्वेलरीचे संस्थापक एरॉन शम यांनी सांगितले की, हे टॉयलेट आम्हाला विकायचे नाही.

एरॉन यांनी सांगितले की, आम्हाला एक डायमंड आर्ट म्युझियम बनवायचे आहे. अधिकाधिक लोकांनी हे बघावे अशी आमची इच्छा आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये या सोनेरी टॉयलेटबद्दल भलतीच उत्सुकता दिसत आहे.

Leave a Comment