रेडमीचा 4 रिअर कॅमेरे आणि एनएफसीवाला दमदार फोन लाँच

चीनी कंपनी शाओमीने स्पेनमधील इव्हेंटमधील आपल्या 8 सीरिजमधील नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 8 टी लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहे. याशिवाय फोनमध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 655 प्रोसेसर मिळेल. याशिवाय यात एनएफसी (निअर फील्ड कम्यूनिकेशन) फीचर देण्यात आला आहे. लवकरच हा फोन भारतात देखील लाँच होण्याची शक्यता आहे.

कंपनीने रेडमी नोट 8 टी स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. 3 जीबी रॅम + 32 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14000 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15600 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19600 रुपये आहे. हा फोन स्टारस्कॅप ब्लू, मूनलाइट व्हाइट आणि मूनशॅडो ग्रे या रंगात मिळेल.

(Source)

या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच फुल एचडी प्लस (1080×2340 पिक्सल) इन-सेल एलसीडी पॅनेल डिस्प्ले देण्यात आला आहे. यात MIUI 10 सोबत अँड्रॉईड 9 पाय ओएस आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 655 प्रोसेसर मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यात 48 मेगापिक्सल सॅमसंग GM1 प्रायमरी सेंसर + 8 मेगापिक्सल 120 डिग्री अल्ट्रा वाइड-अँगल लेंस + 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर लेंस + 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंससोबत ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 13 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

(Source)

कनेक्टिविटीसाठी यात 4जी, वाय-फाय 802.11, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 एमएम ऑडियो जॅक मिळेल. या फोनमध्ये 18 वॉट चार्जिंग सपोर्टसह 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

 

Leave a Comment