प्रवाशांना सुरक्षेचे धडे देणार रेल्वेचा ‘गप्पू भैया’

रेल्वेने सर्वसामान्य लोकांना सुरक्षेबद्दल व महत्त्वाच्या गोष्टी समजविण्यासाठी खास कार्टुन कॅरेक्टर लाँच केले आहे. या कार्टुन कॅरेक्टरचे नाव गप्पू भैया असे आहे. आता गप्पू भैया सुरक्षित प्रवास कसा करायचा हे सांगेल. यासाठी 9 वेगवेगळ्या एनिमेशन सीरिज तयार करण्यात आल्या आहेत. या चित्रपटांद्वारे लोकांना विविध धोक्यांविषयी माहिती दिली जाईल.

रेल्वे बोर्डाने नॉर्थन सेंट्रेल रेल्वेद्वारे (एनसीआर) लाँच करण्यात आलेले गप्पू भैया सीरिज सर्व प्रमुख रेल्वे स्टेशनवर दाखविण्याचा निर्णय घेतला.

रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांच्या चुकीमुळे अनेक दुर्घटना होतात. या घटना कमी करण्यासाठी हे कॅरेक्टर लाँच करण्यात आले आहे. रेल्वे आधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लोक सर्वसाधारण चित्रपटांकडे लक्ष देत नाहीत, मात्र कार्टुनकडे ते नक्की बघतात. हे एनिमेशन चित्रपट सर्व प्रमुख रेल्वे स्टेशन आणि सोशल मीडियावर दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व एनिमेशन चित्रपट 57 मिनिटांचे आहेत.

प्रवास करताना या गोष्टींची घ्या काळजी –

  • प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टी घेऊ नका.
  • ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन प्रवास केल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते.
  • सेल्फी आणि फोटोग्राफीच्या नादात प्राण जाऊ शकता.
  • एस्कलेटरवर उलटे उतरण्याची छोटीशी चूक महागात पडते.
  • ट्रेनच्या टपावरती बसून प्रवास करू नये.
  • धावत्या ट्रेनमध्ये चढण्या-उतरण्याचे स्टंट करू नका.
  • स्टेशन अथवा प्लॅटफॉर्मवरील अनोखळी गोष्टीला स्पर्श करणे जोखमीचे असते.
  • रेल्वे ट्रॅकवर फिरणे आणि फ्लॅटफॉर्म क्रॉस करण्याची चूक करू नका.
  • दरवाजाला लटकून प्रवास करणे, तुम्हाला महागात पडू शकते.

Leave a Comment