चुकीच्या पद्धतीने रेल्वे ट्रॅक क्रॉस केल्यास आता स्वतः ‘यमराज’ उचलून नेणार

तुम्हाला देखील रेल्वेच्या एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फुटओव्हर ब्रिजच्या ऐवजी रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जाण्याची सवय आहे ? असे असेल तर आताच सावध व्हा. कारण रेल्वेने तुम्हाला रोखण्यासाठी अधिकारी नाही, तर चक्क यमराजाची नेमणूक केली आहे.

पश्चिम रेल्वेने मुंबईत या अनोख्या मोहिमेची सुरूवात केली आहे. चुकीच्या पध्दतीने रेल्वे ट्रॅक करणाऱ्या यमराजाच्या वेशात असणारा व्यक्ती तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जाईल. पश्चिम रेल्वेने या हटके पद्धतीने सुरक्षेविषयी जागृकता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले की, अनधिकृतरित्या ट्रॅक पार करू नका. जर तुम्ही अनधिकृतरित्या ट्रॅक पारे केले तर समोर यमराज उभा आहे.

सोशल मीडियावर रेल्वेच्या या मोहिमेचे कौतूक होत आहेत. या ट्विटला आतापर्यंत 4 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत, तर शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment