आता रकुल प्रीत सिंहसोबत स्क्रिन शेअर करणार अर्जुन कपूर


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह ही नवी जोडी येणार आहे. आगामी एका चित्रपटात ते स्क्रिनशेअर करणार आहेत. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. काश्वी नायर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे जॉन अब्राहम, भूषण कुमार, कृष्ण कुमार, मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी निर्माते आहेत.


या महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होण्याची शक्यता आहे. एक फोटो शेअर करत ही बातमी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. अर्जुन कपूरच्या आगामी पानीपतचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. दुसरीकडे रकुल प्रित सिंगचा मरजावां हा चित्रपट ८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यात रकुलसह सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment