कोणाचीही आमच्या आमदाराकडे फिरकण्याची हिंमत नाही – संजय राऊत


मुंबई – शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे बोलले जात होते. यावर संजय राऊत यांनी आमच्या आमदाराकडे फिरकण्याची कोणाचाही हिंमत नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी भाजपने 12 तासांचा अल्टिमेटम दिल्याचे वृत्त होते. याबाबत बोलताना आम्ही कोणाचाही अल्टिमेटम मानत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. रोज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. त्यांनी आज गुरुवारी देखील पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी आलेल्या विविध बातम्यांसंबंधात उत्तरे दिली.

तसेच संजय राऊत यांनी यावेळी भाजपला बहुमताचा आकडा असेल तर सत्ता स्थापन करा असे आवाहन केले आहे. दरम्यान भाजपकडून शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या येत असल्यामुळे शिवसेनेच्या सर्व 54 आमदारांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. संजय राऊतांनी यावर बोलताना हे वृत्त फेटाळले आहे. भाजपकडून दुसऱ्या पक्षातील आमदार फोडले जात आहेत. आम्हाला काही जण संपर्क करत असल्याची माहिती विरोधी पक्षातील आमदारांनी आपल्या कानावर घातल्याचे राऊतांनी सांगितले. दरम्यान कोणाचीही आमच्या आमदाराकडे फिरकण्याची हिंमत नाही. आमचे आमदार एकनिष्ठ असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

Leave a Comment