नवी दिल्ली – गुगल न्यूज विविध भाषांमधील वापरकर्त्यांना जोडले जाण्यासाठी खास अॅप आणणार आहे. नुकतीच याची घोषणा गुगलने केली. अॅपमधून वापरकर्त्यांना विविध देशांच्या भाषांच्या बातम्या दिसू शकणार आहेत.
आता ‘गुगल न्यूज’वर दिसणार जगभरातील विविध भाषांतील बातम्या
याबाबत गुगलच्या माहितीनुसार एकाचवेळी दोन भाषांमधील बातम्या वापरकर्त्याला लेख दिसू शकणार आहेत. जगभरातील ६० टक्क्यांहून अधिक लोक दोनहून अधिक भाषा बोलण्यासाठी वापरतात. पण त्यांच्या भाषांमधील लेख त्यांना मिळविणे हे आव्हानात्मक असते. त्यांना त्यासाठी विविध वेबसाईट अथवा अॅप पाहावे लागते. याचा अर्थ एकाच वेळी वापरकर्त्याला हिंदी आणि इंग्रजीमध्ये ताज्या बातम्या पाहायच्या असतात. अशा वापरकर्त्यांना स्थानिक भाषेसह दुसऱ्या भाषेत लेख मिळू शकणार आहेत. त्यांना त्याचबरोबर जगभरातील आवडते प्रसिद्ध प्रकाशक आणि विषयाशी जोडले जाणे शक्य होणार असल्याचे गुगलने म्हटले आहे.