नागपूर पोलिसांचे रणवीरच्या ट्विटला भन्नाट उत्तर


अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे 90 च्या दशकातील “व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज युअर स्माईल नंबर”… हे गाणे त्यावेळे एवढेच आजही लोकप्रिय आहे. 1999 मध्ये आलेल्या ‘हसिना मान जायेगी’ या चित्रपटातील हे गाणे 10 वर्षांनंतर अभिनेता रणवीर सिंहमुळे आज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.


रणवीरने नुकताच आपला एक फोटो ट्विट केला. पण या ट्विटमुळे रणवीर नव्हे तर नागपूर पोलीस लोकप्रिय झाले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर वोगच्या फोटोशूटमधील लॅण्डलाईन फोनवर बोलतानाच्या पोजमधील एक फोटो रणवीरने पोस्ट केला. रणवीर या फोटोमध्ये रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. रणवीरने या फोटोत पांढरा शर्ट, पांढऱ्या रंगाची बेल बॉटम पॅण्ट आणि गळ्यात स्कार्फ घातला आहे आणि तो लाल रंगाचा लॅण्डलाईन फोन हातात घेऊन उभा आहे. रणवीरने या फोटोला वॉट इज मोबाईल नंबर? वॉट इज यूअर स्माईल नंबर?, वॉट इज यूअर स्टाईल नंबर? करु क्या डायल नंबर?’ असे कॅप्शन दिले आहे.


त्याच्या अनेक चाहत्यांनी रणवीरच्या या ट्विटला रिट्विट त्याचबरोबर त्यावर कमेंट देखील केल्या आहेत. पण नागपूर पोलिसांनी त्याच्या या ट्विटला दिलेले उत्तर त्याच्या ट्विटपेक्षाही जास्त व्हायरल झाले. रणवीरचे हे ट्विट नागपूर पोलिसांनी रिट्विट करत त्याला ‘100’ असे उत्तर दिले. नागपूर पोलिसांनी त्यांच्या भन्नाट पद्धतीने 100 डायल करा, म्हणजेच पोलिसांचा नंबर डायल करा, असे सांगितले आहे.

आतापर्यंत 1100 पेक्षा जास्त रणवीरच्या ट्विटला रिट्विट केले गेले आहे. तर आतापर्यंत 4 हजाराहून जास्त रिट्विट नागपूर पोलिसांच्या ट्विटला मिळाले आहेत. नागपूर पोलिसांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. नेटकरी यावर अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. नेहमीच अशाप्रकारचे ट्विट नागपूर पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन केले जातात. यापूर्वी चंद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरविषयीही नागपूर पोलिसांनी केलेले ट्विट व्हायरल झाले होते.

Leave a Comment