तुमच्या मोबाईलमध्ये नाही ना बँक खाते रिकामे करणारे अॅप, असेल तर त्वरित डिलीट करा


डिजीटल युगात आज आपली अनेक कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून चुटकीसरशी होतात. अनेक आर्थिक व्यवहार ऑनलाइनमुळे मोबाईलवरून केले जातात. पण एक धोक्याची सूचना आता अँड्रॉइड युजर्ससाठी आहे. असे एक अॅप प्ले स्टोअरवर समोर आले आहे ज्यामुळे युजर्सचे बँक अकाउंट त्याच्या नकळत रिकामे होत आहे. ‘ai.type’अशा नावाचे अॅप सेक्युअर डी टीमकडून करण्यात आलेल्या नव्या संशोधनात सापडले आहे. युजरच्या परवानगीशिवाय जे प्रीमियन डिजिटल सर्व्हिस खरेदी करते. युजरला यामध्ये प्रीमियम कंटेंट सर्व्हिस खरेदी केल्याचे समजत नाही.

यासंदर्भात मॅशेबल इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सेक्युअर डी टीमने सांगितले की, बॅकग्राउंडमध्ये हे अॅप काम करत होते. युजरला यामध्ये कोणतीच कल्पना न देता खोट्या जाहिराती दाखवल्या जात होत्या असत. हे अॅप त्याचवेळी डिजिटल खरेदी करत होते त्याचे पैसे युजर्सच्या खात्यातून भरले जात होते.

Ai.type हे एक थर्ड-पार्टी keyboard अँड्रॉइड अॅप असून 4 कोटी युजर्सनी जे डाऊनलोड केले आहे. हे अॅप इस्त्रायलमधील कंपनी ai.type LTD ने तयार केले असून Free Emoji keyboard असे त्याला डिस्क्रिप्शन दिले आहे. सेक्युअर डी टीमने सांगितले की, या अॅपने फसवणुक करून आतापर्यंत जवळपास 127 कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न सेक्युअर डीने हाणून पाडला. 1 लाखांहून अधिक मोबाईलमधून तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांच्या ट्रान्झॅक्शनची रिक्वेस्ट आली आहे. 13 देशांमध्ये हे अॅप वापरले जाते.

प्ले स्टोअरने यावर बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटीमुळे कारवाई करत अॅप हटवले होते. पण हे अॅप ज्या युजर्सनी अनइन्स्टॉल केले नाही ते जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. युजर्सना सावध करताना हे अॅप अनइन्स्टॉल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment