स्वच्छ फळांसाठी


फळे आणि भाजीपाला यांच्यावर विविध किटकांचा हल्ला होत असतो म्हणून ती फळे आणि भाज्या या किटनाशक आणि रासायनिक खते यांनी युक्त होतात. त्यांच्या सेवनाने ती विषारी औषधे आणि रासायनिक खते आपल्या पोटात जातात आणि आपल्याला अनेक विकार जडू शकतात. म्हणून सातत्याने असा इशारा दिला जातो की, सावधान, आपण काय खात आहोत याचा नीट विचार करा. अर्थात, आपण कितीही विचार केला तरी त्या भाज्या आणि फळातील किटकनाशके आणि रासायनिक खते यांचे प्रमाण कमी करणे आपल्या हातात नाही. मात्र असे असले तरी अशा विषांनीयुक्त असलेल्या भाज्या आणि फळे यांचे आपल्याला कमीत कमी उपद्रव व्हावेत याबाबत सावधान राहणे तरी आपल्या हातात आहे. तेव्हा आहारतज्ञांनी या विषारी द्रव्यांपासून कसे अलिप्त रहावे याचे काही मार्ग सुचवले आहेत.

भाज्या आणि फळांमध्ये केवळ खतांचा आणि पेस्टिसाईडचाच विषारी अंश असतो असे नाही तर ती फळे तोडून, पिकवून आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यावर धूळ साचते किंवा साठवणीतल्या दोषांमुळे ते खराब होतात किंवा फळे चमकावीत म्हणून, भाज्या हिरव्यागार दिसाव्यात म्हणून त्यांना अनेक प्रकारची रासायने चोपडली जातात आणि त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून ही फळे किंवा भाज्या घरी आणल्यानंतर धुतल्याशिवाय वापरू नयेत. विशेषतः ज्या फळांवर किंवा भाज्यांवर धूळ बसलेली असते ती धूळ तरी त्यांच्या धुण्याने कमी होते.

फळे किंवा भाज्या खाण्यापूर्वी ती काही काळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावीत. त्यामुळे त्यांच्यातील औषधांचे आणि खतांचे रासायनिक अंश कमी होण्याची शक्यता असते. काही फळे आणि भाज्या स्वच्छ धुतल्या तरी त्यांच्यातली अशुध्दता कमी होतेच असे नाही. तेव्हा शक्यतो ज्या फळांच्या साली काढणे शक्य असते त्यांच्या साली फेकून देऊन मगच खावे. लिंबू आणि सोडा यांचे मिश्रण असलेले पाणी हे एक जंतूनाशक मानले जाते. म्हणजे हे मिश्रण पोटातल्यासुध्दा जंतूंवर प्रतिबंध करत राहते. एक चमचा हळद पाण्यात घालून त्याचे मिश्रण करावे आणि ते निरनिराळ्या जंतूनाशकांच्या अंशापासून पिकांना संरक्षक म्हणून काम करत राहते. त्याशिवायही आणखीन काही उपाय सांगितले गेलेले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment