रोहित शेट्टीच्या गाड्यांच्या ताफ्यात दाखल झाली Lamborghini Urus


दिग्दर्शक रोहित शेट्टीची बॉलीवूडमध्ये हवेत उडणाऱ्या गाड्यांचे सीन किंवा अभिनेत्याच्या गाडीची होणारी जोरदार टक्कर अशी ओळख आहे. आपल्या या अॅक्शन सीन्ससाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. चित्रपटांमध्ये गाड्यांचे अॅक्शन सीन दाखवणारा रोहित शेट्टी आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही गाड्यांचा शौकिन असल्याचे पहायला मिळते. आपल्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये नुकतेच रोहितने आणखी एका गाडीचा समावेश केला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोहित शेट्टीने गाडीसोबतचा एक फोटो शेअर केला. ही पिवळ्या रंगाची Lamborghini Urus ही नवी लक्झरी कार रोहितने स्वत:साठी विकत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. तब्बल ३ कोटी रुपये या Lamborghini Urus ची किंमत आहे. ही कार भारतातील काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे आहे. आता रोहित शेट्टीचा या Lamborghini Urus असणाऱ्या भारतीयांमध्ये समावेश झाला आहे. अनेक महागड्या गाड्या रोहित शेट्टीकडे आहेत. फोर्ड, रेंज रोवर अशा अनेक गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या गाड्यांमध्ये आता Lamborghini Urus चा समावेश झाला.

रोहित शेट्टीला चित्रपटात वापरण्यात आलेल्या गाड्यांसंदर्भात हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. रोहित शेट्टीने त्यावर आम्ही चित्रपटातील स्टंटमध्ये वापरत असलेल्या सगळ्या गाड्या आमच्याकडेच ठेवतो. पण स्टंट दरम्यान कधीकधी गाड्यांमध्ये बिघाड होतो. तेव्हा आम्ही काहीच करु शकत नाही. पण त्या गाड्यांचा आम्ही पुढच्या चित्रपटामध्ये वापर करतो. अन्यथा सर्व गाड्या माझ्या घराच्या बेसमेंटमध्ये असतात. कधीकधी मी फिरण्यासाठी त्या बाहेर काढतो, असे रोहित शेट्टी म्हणाला.

Leave a Comment