व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचरमुळे कोणीही करू शकणार नाही ग्रुपमध्ये अ‍ॅड

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर असे कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करू शकतो, जे त्याला कोणत्याही ग्रुपमध्ये अँड करू शकणार नाहीत. याशिवाय हे कॉन्टॅक्ट्स ग्रुपमध्ये येण्यासाठी इनव्हेटिशन देखील पाठवू शकणार नाहीत. जगभरातील युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर रोलआउट केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पहिल्यापासूनच असणारा ‘Nobody’ पर्याय तसाच राहिल. यासोबतच नवीन फीचर ‘My Contacts Except’ जोडले जाईल. युजर्स ‘Nobody’ पर्याय सुरू ठेऊ शकतात. अशावेळी जर दुसऱ्या कोणी युजरने तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड केले तर त्याचे नॉटिफिकेशन मिळेल.

(Source)

व्हॉट्सअ‍ॅपने ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘My Contacts Except’ फीचरद्वारे युजर्स ज्या कॉन्टॅक्टच्या ग्रुपमध्ये सहभाही व्हायचे नाही, त्याला सिलेक्ट करू शकतात.

Leave a Comment