गर्भवती मांजरीची हत्या करणाऱ्याला 36 महिन्याचा कारावास आणि 7 लाखांचा दंड

मलेशियाच्या सेलायंग सत्र न्यायालयाने ड्रायरद्वारे गर्भवती मांजरीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 34 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 9700 डॉलर (जवळपास 7 लाख रूपये) डॉलरचा दंड देखील लावला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, दंडाची रक्कम न भरल्यास 4 महिने अतिरिक्त शिक्षेत वाढ होईल. मांजरीची हत्या करणाऱ्या गणेश नावाच्या व्यक्तीला प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे.

न्यायाधीश रासिहाह गजाली म्हणाले की, आशा आहे की ही शिक्षा इतरांसाठी देखील एक उदाहरण ठरेल. यामुळे लोकांना प्राण्यांशी क्रुर न वागण्याचा धडा मिळेल. दरम्यान गणेशने स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात जाणाऱ्या अपीलमुळे त्याला जामीन मिळाला आहे.

एका सीसीटिव्ही फुटेजद्वारे या मांजरीच्या हत्येचा खुलासा झाला. फुटेजमध्ये गणेश मांजरील ड्रायरमध्ये भरताना दिसत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना एक महिलेने दिली. महिलेने जेव्हा ड्रायरचा वापर केला, तेव्हा त्यात तिला मांजरीचे शव सापडले. त्यानंतर याबाबतची माहिती तिने पोलिसांना दिली.

 

 

Leave a Comment