या तंत्रज्ञानांमुळे काही वर्षात दिव्यांगाना मिळणार तीनपट अधिक रोजगाराची संधी

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) सारख्या तंत्रामुळे दिव्यांगाना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळत आहे. रिसर्च कंपनी गार्टनरनुसार, 2023 पर्यंत नोकरी करणाऱ्या दिव्यांगाच्या संख्येत तीन पटीनी वाढ होईल.

गार्टनरनुसार, एआय सारख्या तंत्रामुळे काम करण्याच्या अडचणी आणि फिजिकल वर्किंग कमी होईल व केवळ कमांड बेस्ड काम करता येईल. अशा परिस्थितीत दिव्यांग केवळ आपल्या मेंदूचा वापर करून रोजगार मिळविण्यास सक्षम होतील. एआय, ऑग्मेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी सारख्या तंत्रामुळे दिव्यांगाना काम करणे सोपे झाले आहे.

काही निवडक हॉटेलमध्ये एआय रोबोटिक्स तंत्राचा वापर होतो. यात लकवाग्रस्त वेटर रिमोटद्वारे रोबॉटला नियंत्रित करून ऑर्डर घेतात. रिपोर्टनुसार, ज्या कंपनीनी दिव्यांगाना नोकरी दिली त्यांचा रिटेंशन रेट देखील 89 टक्के कायम राहिला. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये 72 टक्क्यांनी वृध्दी झाली. यामुळे नफ्यात देखील 29 टक्क्यांनी वाढ झाली.

गार्टनरनुसार, 2020 नंतर एआय तंत्राबरोबर इमोशन देखील जोडले जाईल. म्हणजेच आर्टिफिशियल इमोशनल इंटेलिजेंसी आल्यानंतर कंपन्या ग्राहकांच्या खरेदी पॅटर्नसोबतच त्यांचे इमोशन देखील समजू शकतील. बाजारात वापरण्यात येणाऱ्या तंत्रामध्ये एआय व मशीन लर्निंगचा भाग 28 टक्के असेल. हे तंत्रज्ञान 87 टक्के मार्केटवर प्रभाव टाकेल.

Leave a Comment