वैज्ञानिकांना समुद्री गुहेत सापडले तब्बल 25 लाख वर्ष जुने अवशेष

खोल समुद्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र कधीकधी एखादी गोष्ट अशी सापडते की, ती सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकते. असेच काहीसे मॅक्सिकोच्या मेडेरिया येथील चोलुल जिल्ह्यात वैज्ञानिकांना 2034 वर्ग फूट क्षेत्रात पसरलेल्या 91 फूट खोल समुद्री गुहेत सापडले आहे. वैज्ञानिकांना या ठिकाणी 13 असे अवशेष सापडले जे 25 लाख वर्षांपेक्षा जुने आहेत.

(Source)

जे अवशेष सापडले आहेत, ते 13 विविध प्रजातींच्या शार्कचे दात आहेत. या दातांचा शोध गुहेचा अभ्यास करत असताना वैज्ञानिक विलिचिस जपाटा आणि फोटोग्राफर एरिक सोसा रोड्रिग्यूज यांनी लावला.

(Source)

विलिचिस जपाटा यांनी सांगितले की, गुहेतील भितींचा अभ्यास करत असतानाच त्यांचे लक्ष काही टोकदार वस्तूंकडे गेली. जवळ जाऊन बघितल्यावर ते टोकदार दात असल्याचे दिसले. 13 दातांचे परिक्षण केल्यानंतर हे दात 25 लाख वर्ष जुन्या शार्कचे असल्याचे समोर आले आहे. सांगण्यात येत आहे की, हे जात मेगालोडॉन नावाच्या प्रजातीचे आहेत.

(Source)

वैज्ञानिकांनुसार, या शोधावरून स्पष्ट होते की, 25 लाख वर्षांपुर्वी देखील समुद्राच्या खाली जीव होते. या अवशेषांना जॉक, सेनॉट हे नाव देण्यात आले आहे. माया सभ्यतेमध्ये जॉकचा अर्थ शार्क आणि सेनॉटचा अर्थ नैसर्गिक खोलपणा असा होतो.

(Source)

दातांशिवाय वैज्ञानिकांना जीवाश्म देखील सापडले आहेत. हे लुप्त झालेल्या प्राण्यांचे आणि मानवाच्या हडांचे असू शकते. हे सर्व अवशेष भितींला चिटकलेले सापडले.

Leave a Comment