शाओमीने भारतात लाँच केले ऑर्गेनिक टी-शर्ट

चीनची टेक्नोलॉजी कंपनी शाओमीने भारतात ऑर्गेनिक टी-शर्ट लाँच केले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हे इको-फ्रेंडली टी-शर्ट नैसर्गिक पद्धतीने उगवण्यात आलेल्या कापसापासून बनविण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांचे टी-शर्ट खूपच मऊ आणि टिकाऊ आहे.

याशिवाय टी-शर्ट एका टॅगसोबत मिळेल, ज्यात बीज असेल. हे बीज उगवले जाऊ शकते. मात्र कंपनीने स्पष्ट केले नाही की, टॅगसोबत देणारे हे बीज कोणत्या प्रजातीचे आहे. हे टी-शर्ट एका बॅगसोबत येईल, जी रिसायकल करता येते.

एमआयचे हे टी-शर्ट स्मॉल, मीडियम, लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज साइजमध्ये मिळेल. हे हाताने व मशीन दोन्हीने धुवता येते. सध्या हे टी-शर्ट केवळ पांढऱ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. एमआयच्या वेबसाइट्सवर याची विक्री सुरू आहे. याची किंमत 499 रूपये आहे.

Leave a Comment