टोयोटाने लाँच केली शानदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही

जापानी वाहन निर्माता कंपनी टोयोटाने आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये आणखी एक शानदार एसयूव्ही रेइझला (Raize) जापानमध्ये लाँच केले आहे. कंपनी लवकरच ही एसयूव्ही भारतीय बाजारात देखील लाँच करण्याची शक्यता आहे. जापानमध्ये या कारची किंमत 16,79,000 येन (जवळपास 10 लाख रूपये) आहे.

(Source)

टोयोटा  Raize ला कंपनीने केवळ एक इंजिन पर्यायामध्ये बाजारात आणले आहे. यामध्ये कंपनीने 1.0 लीटर क्षमतेचे 1KR-VET इंजिन दिले आहे. जे 96 बीएचपीची पॉवर आणि 140 एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये सीव्हीटी ट्रांसमिशन गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही एसयूव्ही शानदार परफॉर्मेंससोबत दमदार मायलेज देखील देईल. ही कार प्रती लीटर पेट्रोलमध्ये 17.4 किमीचे मायलेज देते.

(Source)

 

डिझाईनबद्दल सांगायचे तर या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये पुढे मोठ्या ग्रिलसोबत एलईडी डे टाइम रनिंग लाइट्सचा प्रयोग केला आहे. याशिवाय सी-पिलर बॉडी फ्रेमसोबत ड्युल टोन ब्लॅक रूफचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये 17 इंचचे एलॉय व्हिल देण्यात आले आहेत.

(source)

याशिवाय कंपनीने अनेक खास फीचर्स दिले आहेत. यामध्ये 7 इंचचा टीएफटी कलर डिस्प्ले दिला आहे. ज्यात स्मार्ट डिव्हाईस लिंक आणि अपल कार प्ले कनेक्ट करता येईल. स्टेअरिंग व्हिलवर लेदरच्या रॅपिंगसोबत मल्टी फंक्शन बटन देखील देण्यात आले आहेत. या बटनांद्वारे इन्फोटेंमेट सिस्टम वापरता येईल.

 

Leave a Comment