लहान मुलांना विकता येणार नाहीत अधिक प्रमाणात साखर-मीठ असलेले खाद्य पदार्थ

लहान मुलांमधील वाढणारा लठ्ठपणा हा जगभरात चितेंचा विषय आहे. भारतात केवळ वयस्कच नाही तर लहान मुलांच्या लठ्ठपणाची आकडेवारी देखील वाढत आहे. चीननंतर भारत हा लहान मुलांच्या लठ्ठपणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लहान मुलांच्या लठ्ठपणाला अधिक मात्रेत साखर, मीठ आणि तेलाचे खाद्य पदार्थ व फास्ट फूड जबाबदार आहेत.

याच कारणामुळे आता मुलांना शाळेत विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर नियंत्रण आणण्याची तयारी आहे. एफएसएसएआय याविषयी मसूदा तयार करत आहे. सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर शाळेत विकले जाणारे पदार्थ आणि त्याच्या विक्रेत्यांविषयी एक धोरण ठरविले जाईल. याला टेन प्वाइंट चार्टर नाव दिले जाऊ शकते.

एफएसएसएआयच्या टेन प्वाइंट चार्टरनुसार, शाळेत खाद्य पदार्थ विक्रेत्यांना परवाना घेणे आवश्यक आहे. याशिवाय शाळा अथवा शाळेच्या 50 मीटर भागात फास्ट फूड विक्रेत्यांवर बंदी घातली जाईल.

ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर, तेलाचे प्रमाण असेल, असे पदार्थ विकण्यास बंदी घातली जाणार आहे. शाळेत बनविण्यात येणाऱ्या जेवणासाठी देखील नियम पाळणे गरजेचे आहे.

सर्व शाळांना नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनद्वारे मान्यता देण्यात आलेल्या पदार्थांनाच प्राथमिकता द्यावी लागेल. शाळेत ताजी फळे, ज्यूस सारखे पदार्थ विकण्यास प्राथमिकता देण्यात येऊ शकते. तसेच शाळेत न्यूट्रिशन एक्सपर्ट अथवा शिक्षकाची भूमिका अनिवार्य असेल.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment