प्रेम केले म्हणून चक्क कुत्र्याला नोकरीवरून टाकले काढून


ऑस्ट्रेलियातील क्विंसलॅंड पोलीस सेवेत ‘शिपायी कुत्रा’ पदावर कार्यरत असलेल्या एका उद्योगी कुत्र्याला कामावरून काढून टाकण्यात आले असून या कुत्र्याचे नाव गेवेल असे असून, तो कामाऐवजी माणसांभोवतीच घुटमळत असे. तसेच लोकांनी त्याचे पोट खाजवल्यास त्याला अधिक आनंद मिळत असे. तो लोकांनी तसे करावे म्हणून सारखा लोकांच्या आजुबाजुलाच फिरत असे.

सुरूवातीला गेवेलकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. पण त्याने पूढे पूढे आपले वर्तन सुधारले नाहीच आणि तो लोकांभोवती अधिकच घुटमळत राहिला. ६ महिन्यांचे प्रशिक्षणही त्याला दिले होते. तो त्यावेळी अवघ्या ६ महिन्यांचा होता क्विंसलॅंड येथील गव्हर्नमेंट हाऊसमध्ये तेव्हा त्याला आणण्यात आले होते. पोलिस सर्व्हिस डॉग बनविण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या प्रशिक्षणात त्याला प्रचंड प्रयत्न झाले. पण त्याचे वर्तन सुधारले नाही. तो लोकांभोवतीच घुटमळत राहिला. त्याच्या या वागण्यामुळे तो एप्टीट्यूड टेस्टमध्ये नापास झाला.

याबाबत आलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी जरी जर्मन शेफर्ड वंशाच्या गेवेलला नोकरीवरून काढले असले तरी, त्याला लगेच दुसरी नोकरीही मिळाली आहे. त्यामुळे तो सध्या भलताच खुश आहे. गव्हर्नमेंट हाऊसचे प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याला ब्रिसबेन येथील पैडिग्टन येथील गव्हर्नर हाऊस येथे ठेवण्यात आले आहे. येथे तो आलेल्या लोकांचे स्वागत करेन. तसेच, नव्या ठिकाणी त्याचे नवे पदही निर्माण करण्यात आले आहे.’वाइस रीगल डॉग’, असे त्याच्या पदाचे नाव आहे.

Leave a Comment