घामातून रोगाचा प्रसार


जगाची लोकसंख्या ९०० कोटी आहे. परंतु या ९०० कोटीमध्ये दोन व्यक्ती पूर्णपणे सारख्या सापडणे अशक्य आहे. या ९०० जणांचे ९०० प्रकार आहे. यातल्या प्रत्येकाच्या बोटांचे ठसे एक सारखे नाहीत. प्रत्येकाचा ठसा वेगळा आहे. प्रत्येकाचा घामाचा वास वेगळा आहे. एकाच्या घामासारखा वास दुसर्‍याच्या घामाला येणार नाही. घामाचे एवढे प्रकार तर आहेतच परंतु घामातून रोगांचा प्रसारसुध्दा होऊ शकतो. कारण घामामध्ये काही रोगजंतू असतात आणि जिथे जास्त घाम गाळला जातो म्हणजे विशेषतः जीममध्ये, खेळांच्या मैदानावर, मुंबईतल्या लोकलमध्ये एकाच्या घामातील रोगजंतू दुसर्‍या शरीरात प्रवेश करू शकतात. अलीकडच्या काळात घामातून प्रसारित होणार्‍या रोगांवर विशेष संशोधन करण्यात आलेले आहे.

एक प्रकारचा सुपरबग त्वचेच्या स्पर्शातून म्हणजेच घामातून दुसर्‍याच्या शरीरात प्रविष्ट होऊ शकतो. घामाद्वारे प्रसारित होणार्‍या या सुपरबगला अजून तरी उपाय सापडलेला नाही. हा सुपरबग रक्तप्रवाहातसुध्दा दोष निर्माण करतो. फुफ्फुसांना बाधित करतो आणि मूत्रमार्गालाही प्रदूषित करू शकतो. तेव्हा घामेजलेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचे शक्यतो टाळले पाहिजे. हिपॅटिटिस बी हा व्हायरससुध्दा घामाच्या माध्यमातून पसरू शकतो, अशी शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. मात्र तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आजवर हा व्हायरस उघड्या जखमा आणि म्युकस मेंब्रेन यातून प्रसारित होतो असे मानले जात होते.

असे असले तरी ऑलिम्पिकमधील काही खेळाडूंच्या आजारावर संशोधन केले असता त्यांना त्या आजाराची बाधा अन्य कोणाच्या तरी घामातून झालेली असल्याचे दिसून आले. या संबंधीचा वृत्तांत ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस् मेडिसीन या नियतकालिकात प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेणार्‍या खेळाडूंपैकी ११ टक्के खेळाडूंच्या घामामध्ये कसले ना कसले रोगजंतू असतात असे या संबंधात संशोधन करणार्‍या संशोधकांना आढळले आहे. कोणताही रोगजंतू रक्तात जेवढा प्रभावीपणे वास्तव्य करतो तेवढाच प्रभावीपणे तो घामातसुध्दा असतो, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र काही संशोधकांचे म्हणणे असे आहे की प्रत्यक्षात घामामध्ये रोगजंतू नसतोच तो त्वचेवर असतो आणि घामाच्या माध्यमातून त्वचेवरचा हा रोगजंतू दुसर्‍याच्या त्वचेवर जातो. एकंदरीत घाम हा त्रासदायक आहे हे नक्की.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment