एसआयपीद्वारे असा मिळेल गुंतवणूकीचा फायदा, जाणून घ्या सर्वकाही

गुंतवणूक करून प्रत्येकाला नफा मिळवायचा असतो, मात्र त्यासाठी गुंतवणूक कोठे व कधी करायची हे माहिती असणे गरजेचे आहे. अनेकांना एसआयपी, एक्विटी, डेब्ट फंड आणि म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करायची हेच माहिती नसते.

एसआयपी काय आहे ?

एसआयपीला सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन म्हटले जाते. या अंतर्गत म्युच्युअल फंडमध्ये ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. यामध्ये कधी, किती दिवसांसाठी व किती रक्कम भरायची हे सर्व गुंतवणूकदार ठरवू शकतो. अनेकांना वाटते की, एसआयपी एक तर म्युच्युअल फंड आहे किंवा त्या पेक्षा वेगळे आहे. मात्र एसआयपी हे चांगल्या गुंतवणूकीचा एक प्रकार आहे.

एसआयपीमधील गुंतवणूक ही मोठ्या कालावधीसाठी असते. तसे इक्विटी फंडात दीर्घकालीन एसआयपी काम करते, मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या दीर्घकालीन लक्ष्यापर्यंत पोहचाल. यासाठी तुम्हाला योग्य एसआयपी रक्कम गुंतवावी लागेल. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही गुंतवू शकता.

समजा, तुम्हाला 15 वर्षात 1 कोटी रूपये बनवायचे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की, केवळ 15 वर्षात म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये काही रक्कम गुंतवल्यावर मोठा परतावा मिळेल, तर असे नाहीये. प्रत्येक महिन्याला रक्कम जमा करण्याआधी निश्चित करा की, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी किती गुंतवणूकीची गरज आहे.

समजा तुम्ही दर महिन्याला 10 हजार रूपये एसआयपीद्वारे पुढील 15 वर्षांसाठी गुंतवलत असाल. जर तुम्हाला यावर वार्षिक 10-12 टक्के रिटर्न मिळत असेल, तर तुम्ही 15 वर्षात 40 ते 50 लाख रूपये जमवू शकाल. एसआयपीद्वारे फायदा होतो, मात्र तुम्हाला हवा तेवढा होत नाही. कारण तुमचे लक्ष्य 1 कोटी होते. रिटर्नमधील वाढ-उतार बाजाराच्या पदर्शन आणि अस्थिरतेवर अवलंबून असते.

एसआयपीचे फायदे –

एसआयपीद्वारे तुम्ही नियमित एक विशेष रक्कम जमा करू शकता. तुम्ही प्रती महिन्याला 500 रूपये जमा करण्यापासून देखील सुरूवात करू शकता.

 

Leave a Comment