आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्लस संघाकडून खेळणार रविचंद्रन अश्विन !


ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात दिल्ली कॅपिट्लस संघाकडून खेळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गत सत्रात अश्विन किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता. गुणतालिकेत संघ सहाव्या क्रमांकावर होता. या मोसमात अनिल कुंबळे हे मुख्य प्रशिक्षक बनले तेव्हापासून फ्रेंचायझी अश्विनला सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा संघ अश्विनऐवजी पंजाबला दोन खेळाडू देईल.

दिल्ली कॅपिटलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन फ्रँचायझींमध्ये करार अंतिम झाला आहे. लवकरच याची घोषणा केली जाईल. अश्विन निघून गेल्यानंतर लोकेश राहुलला संघाचा कर्णधार म्हणून नेमले जाईल, असा विश्वास आहे. ख्रिस गेलनंतर तो संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. गेल 40 वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला संघाचे नेतृत्व देण्यात येणार नाही.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अश्विन दिल्ली कॅपिट्लसशी जोडला जात होत आहे. हा करार यापूर्वी करता आला नाही, कारण पंजाब संघ ट्रेडद्वारे कोणत्या दोन खेळाडूंना हवे आहे हे अद्याप ठरवू शकले नाही. तथापि, त्याने आता या करारास सहमती दर्शविली आहे. पंजाबकडून दिल्लीचे दोन खेळाडू कोण खेळणार हे अद्याप कळू शकलेले नाही.

अश्विनच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत पंजाब संघ पहिल्या हाफमध्ये अधिक चांगला खेळला, पण दुसर्‍या हाफमध्ये संघाची कामगिरी खराब राहिली. टीम 2018 मध्ये सातव्या आणि 2019 मध्ये सहाव्या स्थानावर होती. अश्विनने पंजाबकडून आतापर्यंत 28 सामने खेळले असून ज्यात 25 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजाएंटकडून खेळला आहे.

गेल्या पाच वर्षांत पंजाब संघाने पाच प्रशिक्षक बदलले आहेत. कुंबळेपूर्वी माईक हेसन, ब्रॅड हॉज, वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांनी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते. 2015 आणि 2016 मध्ये पंजाब संघ शेवटच्या स्थानी होता. त्यानंतर 2017 मध्ये पाचव्या क्रमांकावर होता. 2014 मध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती, परंतु चॅम्पियन होऊ शकला नाही. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात संघाने उपांत्य फेरी गाठली होती.

Leave a Comment