या ‘महुआ’ झाडाला बघण्यासाठी लाखो लोक का करत आहेत गर्दी ?

मध्य प्रदेशच्या सतपुडा टायगर रिझर्व्हमध्ये असलेले महुआचे झाड पुजण्यासाठी लांबून लोक येत आहेत. यामुळे संवेदनशील वन क्षेत्र एखाद्या खराब मैदानात बदलले आहे. रविवारी आणि बुधवारी लाखोंच्या संख्येत नागरिक येथे येतात. त्यामुळे स्थानिक वन विभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांना येथील परिस्थिती सांभाळावी लागते.

काही लोक तर झाडाची साल देखील घरी घेऊन जातात. दररोज 10 हजार लोक या ठिकाणी येतात. काही लोक त्यांचा गंभीर आजार बरा होईल, या आशेने येते येतात. तर काही लोक इच्छा पुर्ण करण्यासाठी येतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, या झाडाला स्पर्श केल्यास आजार होत नाही. तर काही जण केवळ उत्सुकतेने येथे येतात.

स्थानिक एसडीएम मदन सिंह रघुवंशी यांनी सांगितले की, ज्या प्रकारे दररोज लोकांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थितीत काही पावले उचलणे गरजेचे आहे. जंगलात काही दुर्घटना देखील होऊ शकते. त्यांनी सांगितले की, नवरात्रीच्या वेळी व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल झाला की, या झाडात जादूई शक्ती आहे. सुरूवातीला लोक केवळ उत्सुकतेपोटी येत असे, मात्र नंतर यात वाढ झाली.

सातपुडा टायगर रिझर्व्ह 524 वर्ग किमीमध्ये पसरलेले आहे. मात्र या झाडाचा शोधानंतर या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अगरबत्तींच्या धुरांमुळे येथील झाडे व वनस्पतींवर परिणाम होत आहे. याशिवाय प्राण्यांच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होत आहे.

 

Leave a Comment