गाडीच्या पार्ट्सशी छेडछाड केल्यास होणार कारवाई

जर तुम्ही तुमच्या गाड्याच्या पार्ट्सशी छेडछाड केली, तर तुम्हाला यासाठी दंड बसू शकतो. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या संशोधित मोटार वाहन अधिनियमात एक कलम जोडण्यात आले आहे. त्या अंतर्गत गाडींच्या काही पार्ट्सशी छेडछाड केली तर महागात पडू शकते.

सरकारने गाडीचे पार्ट्स जसे की, स्पीड गव्हर्नर, जीपीएस आणि सीएनजीमध्ये होणारे बदल रोखण्यासाठी मोटार वाहन कायद्यात कलम 182 जोडले आहे. त्यानुसार, या पार्ट्स अथवा कंपोनेंट्ससोबत काही बदल केल्यास कंपनी आणि ग्राहक दोघांना 5 हजारांचा दंड आणि 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

काही लोक सीएनजी किट इंस्टॉल केल्यानंतर त्यातील काही पार्ट्स जसे की, फिलिंग वॉलमध्ये बदल करतात. कलम 182 मध्ये खाजगी आणि कमर्शियल दोन्ही वाहनांसाठी हे नियम लागू होतील. त्यामुळे गाडीच्या पार्ट्समध्ये काहीही बदल केल्यास महागात पडू शकते.

कलम 182 नुसार, कमर्शियल गाड्या जसे की, ट्रक, बस, टॅकर इत्यादींचा हायवे वरील वेग ताशी 80 किमी आणि शहरातील रस्त्यांवर ताशी 40 ते 60 किमी पेक्षा अधिक नसेल. यासाठी लावण्यात आलेले स्पीड गव्हर्नरशी छेडछाड केल्यास 5 हजारांचा दंड आणि 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment