दिल्लीच्या विद्यार्थ्याला फेसबुकची कोट्यावधीची ऑफर

इंद्रप्रस्थ इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमधील (आयआयआयटी) एका विद्यार्थ्याला फेसबुकने चक्क 1.45 कोटी रूपयांच्या नोकरीची ऑफर दिली आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला हे पॅकेज देण्यात आले आहे.

दिल्ली सरकारच्या या इंस्टिट्यूटचे हे विक्रमी प्लेसमेंट प्रपोजल आहे. याशिवाय अन्य दोन विद्यार्थ्यांना 43 लाख आणि 33 लाख रूपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. 2020 मध्ये ग्रॅज्युएशन पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 310 नोकऱ्यांचे प्रस्ताव आले आहेत. विद्यार्थ्यांना 252 इंटर्नशीपच्या ऑफर आल्या आहेत. दिल्ली सरकारच्या आयआयआयटीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत सरासरी 16.33 लाख रूपयांचे पॅकेज मिळत आहे. यामध्ये यूजी आणि पीजी प्रोगामच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हारमान कारडॉन कंपनीने 15 लाख वार्षिक पॅकेजसह 7 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. इंस्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये प्लेसमेंट्ससाठी दुसरा टप्पा पार पडेल. ज्यामध्ये  विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नोकऱ्यांच्या अनेक प्रस्ताव मिळतील.

कॅम्पसमध्ये प्लेसमेंट ड्राइव्हसाठी आलेल्या कंपन्यांमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, फेसबुक, क्वॉलकॉम, सॅमसंग, रिलायन्स, डब्ल्यूडीसी, टॉवर रिसर्च, एनव्हिडीया, एडोबी, गोल्डमन सॅश यांचा समावेश आहे. याशिवाय 2021 मध्ये ग्रॅज्युएशन पुर्ण करणाऱ्यांना 108 इंटर्नशिप ऑफर आल्या आहेत. एका बी-टेक सीएसई 2021 बॅचच्या विद्यार्थ्याला फेसबुक-लंडनकडून 3.31 लाख रूपये स्टायपेंडसोबत इंटर्नशिप ऑफर मिळाली आहे.

Leave a Comment