पहा EICMA 2019 मधील शानदार बाईक्स

सध्या इटलीतील प्रसिध्द शहर मिलान येथे ग्लोबल मोटारसायकल शो EICMA 2019 सुरू आहे. या शोमध्ये अनेक कंपन्या आपल्या कॉन्सेप्ट बाईक सादर करत आहेत. या शोमध्ये सादर झालेल्या काही खास बाईकविषयी जाणून घेऊया.

(Source)

हिरो Xtreme 1R –

EICMA मध्ये हिरो मोटोकार्पने बजाज प्लसर NS160, टिव्हीएस Apache RTR 160 4V आणि होंडा CB Hornet 160R ला टक्कर देण्यासाठी आपली कॉन्सेप्ट स्पोर्ट बाईक हिरो Xtreme 1R लाँच केली आहे.। हिरो Xtreme 1R मध्ये नवीन 160सीसीचे नेकेड स्ट्रीफाइटर इंजिन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की एक्सट्रीम कॉन्सेप्टला युवकांना लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे. या बाईकचे वजन 140 किग्रा पेक्षा अधिक आहे. यामध्ये शार्प डिजाइनसोबत LED हेडलँप्स, सिग्नेचर LED टेल-लँप्स मिळेल.

(source)

केटीएम 790 Adventure

स्पोर्ट्स बाइक बनविणारी कंपनी केटीएमने EICMA मध्ये आपली नवीन केटीएम 390 Adventure वरील पडदा हटवला आहे. ही बाईक दिसायला केटीएम 790 Adventure सारखीच आहे. यामध्ये विंडशील्डसोबत एलईडी हेडलँप आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनेल देण्यात आले आहे. याशिवाय नुकल गार्ड्स, बॅश प्लेट, फ्लॅट सीट आणि सिंगल साइड माउंटेड एग्जास्ट देण्यात आले आहे. या बाईकचे वजन 158 किग्रा असून, यात 14.5 लीटरचे फ्यूल टँक मिळेल.

बाईकमध्ये 373 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन असून, जे 9,000 आरपीएम वर 43 बीएचपीची पॉवर आणि 7,000 आरपीएमवर 37 एनएमचा टॉर्क देते. बाइकमध्ये स्लिपर क्लचसोबत 6-स्पीड गियरबॉक्स मिळेल.

(Source)

होंडा CBR1000RR-R Fireblade

होंडाने CBR1000RR-R Fireblade ही बाईक सादर केली आहे. एल्युमिनियम फ्रेमवरवर बनलेली फायरब्लेडची लांबी 2,100 एमएम, रूंदी 1,140 एमएम आणि उंची 1,455 एमएम आहे. यात मध्यभागी रॅम-एअर डक्ट आणि एलईडी हेडलाइट्स देण्यात आली आहे. बाईकमध्ये 5 इंचचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि सिंगल साइड माउंटेड टाइटेनियम एग्जास्ट देण्यात आले आहे.

बाईकमध्ये 999 सीसीचे इन-लाइन 4 सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन मिळेल. जे 14,500 आरपीएमवर 215 एचपीची पॉवर आणि 12,500 आरपीएमवर 113 एनएम टॉर्क देतेय बाईकमध्ये स्लिपर क्लचसोबत 6-स्पीड गियरबॉक्स मिळेल. बाईकमध्ये लाँच कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोलसोबत एबीएस आणि 9 सेटिंग्स मिळेस.

(source)

होंडा CB4X adventure  –

EICMA 2019 मध्ये होंडाने आपली टूरर बाईक होंडा CB4X चे कॉन्सेप्ट व्हर्जन लाँच केले आहे. होंडाची टीम मागील 5 वर्षांपासून यावर काम करत आहे. ‘फन सेव्हन डेज अ वीक’ थीम अंतर्गत या बाईकला डेव्हलप करण्यात आले आहे. यामध्ये इन-लाइन फोर सिलेंडर इंजिन मिळेल. बाईकमध्ये 17-इंचचे एलॉय व्हिल्स, ब्रेंबो ब्रेकिंग सिस्टम, इनव्हर्टेड टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रिअर मोनोशॉक फीचर मिळतील.

(source)

होडा Rebel 300, Rebel 500 –

रॉयल एनफील्ड सारख्या क्रूजर बाईकला टक्कर देण्यासाठी होंडा आपली बाईक आणण्याच्या तयारीत आहे. या शोमध्ये होंडाने आपल्या दोन क्रूजर बाईक्स रिबेल 300 आणि 500 सादर केल्या आहे.  दिसायला दोन्ही बाईक एक सारख्याच आहे. यामध्ये एलईडीसोबत सर्क्युलर हेडलँप, लहान रेक्ट्यागुलर एलईडी टेललाइट्स आणि रेट्रो लुक असणारे सर्क्युलर टर्न इंडीकेटर्स देण्यात आले आहेत.

बाईकमध्ये 286 आणि 471 सीसीचे लिक्विड कूल्ड पॅरेलल ट्विन इंजिन मिळतील. होंडा CBR500R मध्ये देखील हेच 471सीसी का इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 4505 एचपीची पॉवर आणि 4303 एनएमचा टॉर्क देते. 6-स्पीड ट्रांसमिशन आणि स्लिपर असिस्ट क्लच सोबत येईल.

(Source)

सुझुकी V- Strom –

बाईक शोमध्ये सुझुकी मोटर कार्पोरेशनने आपल्या दोन बाईक्स सुझुकी V- Strom 1050 आणि 1050XT सादर केली आहे. कंपनीने याला ‘द मास्टर ऑफ द एंडव्हेंचर’ म्हटले आहे. या बाईकला जानेवारी 2020 मध्ये युरोपमध्ये लाँच केले जाणार आहे. 1,037cm3 V-twin इंजिन असणाऱ्या या बाईकमध्ये राइड-बाय-वॉयर इलेक्ट्रॉनिक थ्रोटल कंट्रोल सिस्टम मिळेल. याशिवाय सुझुकी इंटेलिजेंट राइड सिस्टम, सुझुकी ड्राइव्ह मोड सिलेक्टर, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल सिस्टम सारखे फीचर मिळतील.

Leave a Comment