१० वर्षांच्या मुलाने लिहिली इंग्रजी कादंबरी


पिथौरागढ – जर स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे, तर यश मिळवणे अवघड नसते असे म्हणतात. मग वय कितीही असो. पिथौरागढ जवळील हुडेती गावातील एका दहा वर्षाच्या बालकाने असाच एक कारनामा करून दाखवला आहे. हार्दिक उप्रेती असे या बुद्धिमान बालकाचे नाव आहे.

खेळण्या-बागडण्याच्या वयात हार्दिक उप्रेतीने इतिहास रचून आपल्या डोंगराळ प्रदेशाचे नाव उज्जवल केले आहे. त्याची लहान वयातील कामगिरी कोणत्याही स्वप्नवत कामगिरीहून कमी नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंग्रजी भाषेत ‘ख्रिसमस मिरॅकल’ नावाची कादंबरी दहा वर्षीय हार्दिकने लिहिली आहे. हार्दिकची ही पहिलीच कादंबरी आहे. ही कादंबरी ब्लू रोज पब्लिकेशनने मार्च महिन्यात प्रकाशित केली आहे. अ ख्रिसमस मिरॅकल कादंबरी ५९ पानांची व ९ भागांमध्ये छापली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक बीजीएस इंटरनॅशनल स्कूल दिल्ली येथे सहावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील लोकेश उप्रेती दिल्लीत एका मल्टीनॅशनल कंपनीत डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत तर आई गृहणी आहे.

Leave a Comment