१३ वर्षानंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार मुन्नाभाई आणि सर्किट


पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची धमाकेदार जोडी पाहायला मिळणार आहे. सर्किट आणि मुन्नाची राजकुमार हिरानी यांच्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील जोडी फार प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात धुमाकूळ घातला. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना तेव्हापासूनच पुन्हा एकदा एकत्र कधी पाहता येईल याबाबत प्रेक्षक उत्सुक होते.

आता लवकरच ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. पण यावेळी ते ‘मुन्नाभाई’च्या सिक्वलसाठी एकत्र येत नसून एका नवीन चित्रपटात झळकणार आहेत. याबाबतची माहिती अर्शद वारसी याने त्याचा आगामी चित्रपट पागलपंतीच्या प्रमोशनवेळी दिली. पुढीलवर्षी येणाऱ्या एका चित्रपटात संजू आणि मी एकत्र काम करणार आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद-फरहाद करणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित केले नसल्याची माहिती देखील अर्शदने दिली.

Leave a Comment