…यामुळे 8 फूट उंचीच्या अफगाणी नागरिकाला नाकारली रुम

एका अफगाणी क्रिकेट चाहत्याला भारतात आल्यावर विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले आहे आणि याला कारण त्याची उंची ठरले आहे. अफगाणी नागरिक असलेले शेर खान यांना त्यांचा 8 फूट उंचीमुळे लखनऊमध्ये रूम मिळण्यास अडचणीचा सामना करावा लागला. त्यांचे संपुर्ण पेपर चेक केल्यानंतर देखील त्यांना कोठेच रूम न मिळाल्याने अखेर त्यांना पोलिसांकडे जावे लागले.

शेर खान हे लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणारी एकदिवसीय मालिका बघण्यासाठी भारतात आले आहेत. मात्र उंचीमुळे त्यांना कोठेच रूम न भेटल्याने त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. शेर खान यांनी पोलिसांना सांगितले की, ते सोमवारी लखनऊला आले होते. मात्र उंचीमुळे कोणत्याही हॉटेलने त्यांना भाड्याने रूम दिली नाही.

(Source)

एसएसपी पश्चिम विकास चंद्र त्रिपाठी यांच्यानुसार, शेर खान यांची उंची 8 फूठ 3 इंच आहे. त्यांना बघूनच हॉटेलवाले रूम देण्यास घाबरत होते. अखेर पोलिसांच्या मदतीने त्यांना चारबाग येथे रूम देण्यात आली.

क्रिकेटची आवड असणारे शेर खान याआधी देखील भारतात आलेले आहेत. ते दिसायला भारतीय पहिलवान द ग्रेट खली सारखे दिसतात. शेर खान यांना ऐक्रेमेगली नावाचा आजार आहे, त्यामुळे त्यांच्या शरीराची एवढी वाढ होते.

दरम्यान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज संघामधील एकदिवसीय मालिका लखनऊमध्ये आजपासून सुरू होणार आहेत.

Leave a Comment