३७ वर्षांपूर्वी गुंतवलेल्या २०० रुपयांचे आता मिळाले करोडो रुपये


लंडन : फक्त २०० रुपयांपर्यंतची गुंतवणूक करुन तुम्हाला कोणी ३७ वर्षांनी करोडो देईल का ? पण कोणाचे नशिब कसे उजळेल सांगता याचा काही नेम नाही. पण एका महिलेने ३७ वर्षांपूर्वी २०० रुपये गुंतवले होते. त्याचे आता तिला करोडो रुपये मिळत आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोण आहे हि महिला? आणि तिने २०० रुपये नेमके कशात गुंतवले होते?. तर या महिलेने ८०च्या दशकात एक अंगठी खरेदी केली होती. इंग्लंडमधील ही महिला रातोरात करोडो रुपयांची मालक बनली आहे. ३७ वर्षापूर्वी गुंतवलेल्या २०० रुपयांच्या बदल्यात तिला आज करोडो रुपये मिळाले आहेत.

खरतर त्या अंगठीला सर्वसाधारण अंगठीप्रमाणे रोज हि महिला बोटात घालत होती. पण त्या महिलेला किंचितही कल्पना नव्हती की तिने बोटात घातलेल्या अंगठीत खरा हिरा आहे आणि त्याची किंमत करोडो रुपये आहे. जेव्हा या महिलेला आपण घातलेल्या अंगठीतील हिरा खरा असल्याचे कळाले तेव्हा तिला काय करायच सुचत नव्हते. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तिने थेट दागिन्यांचा लिलाव करणारी संस्था गाठली. त्यावेळी या २६.२७ कॅरेटच्या हिऱ्याची बाजारभावाप्रमाणे किंमत जवळपास २ कोटी ते ३ कोटी रुपये असल्याचे तिला समजले. पण हिऱ्याच्या खरेदीसाठी बोली लागली गेली त्यावेळी या हिऱ्यासाठी ५.४ कोटींची बोली लागली.

हा हिरा दुर्मिळ असल्यामुळे त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोली लागली असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केलस आहे. हिरा खरा असला तरी त्याला जुन्या पद्धतीने पैलू पाडण्यात आल्यामुळे तो खरा आहे की खोटा याचा अंदाज महिलेला ऐवढी वर्ष आला नाही. तसेच पॉलिश केला नसल्याने हिरा जसा चमकतो तसा हा हिरा चमकतही नव्हता.

Leave a Comment