108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत लाँच झाला शाओमीचा दमदार फोन

शाओमीने आपल्या सीसी सीरिजमधील एमआय सीसी9 प्रो हा स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 5 रिअर कॅमेरे आणि 108 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा देण्यात आला आहे. लूक आणि डिझाईनमध्ये हा फोन शानदार आहे.

या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र यातील खास पीचर पेंटा (5) रियर सेटअप आहे. फोनमध्ये 108 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेऱ्यासोबत 5 मेगापिक्सल टेलिफोटो लेंस, 12 मेगापिक्सल पोट्रेट सेंसर, 20 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस कॅमेरा मिळेल. याशिवाय सेल्फीसाठी यात खास 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

(Source)

या फोनमध्ये 6.47 इंच कर्व्ड ओलेड डिस्ल्पे देण्यात आला आहे. स्क्रीन फूल एचडी+  (1080×2340 पिक्सल) आहे. यात अँड्राईड पायवर बेस्ड MIUI 11  असून, स्नॅपड्रॅगन 730 जी प्रोसेसर मिळेल. बॅटेरीविषयी सांगायचे तर यात 5,260mAh बॅटरी देण्यात आली असून, 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट यात मिळेल. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, एनएफसी सपोर्ट आणि Hi-Res ऑडियो सारखे फीचर्स देखील मिळतील.

(Source)

फोनमध्ये कनेक्टिविटी फीचर्समध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, गॅलिलियो आणि ग्लोनास सारखे फीचर्स देण्यात आले आहे. फोनमध्ये 3.5 एमएमचा हेडफोन जॅक आहे.

(Source)

एमआय सीसी 9प्रो स्मार्टफोन सध्या केवळ चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,799 युआन (जवळपास 28000 रूपये) आहे. तर 8 जीबी रॅम +128जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,099 युआन (जवळपास 31,000 रूपये) आणि 8 जीबी रॅम + 256जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,499 युआन (जवळपास 35,000 रूपये) आहे.

Leave a Comment