विराटचे वाढदिवशी कुमार वयातील चीकूसाठी प्रेरणादायी पत्र


नवी दिल्ली – आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा ३१ वा वाढदिवस आहे. आत्तापर्यंत यशाची अनेक शिखरे विराट कोहलीने पार केली आहेत. त्याने त्यांच्या अफलातून खेळीमुळे भारतीयांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. विराटवर भारतातूनच नाही तर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटने वाढदिवशी स्वतःलाच म्हणजे कुमार वयातील चीकूसाठी एक प्रेरणादायी पत्र लिहले आहे.


विराटने ३१ व्या वाढदिवशी एक खास पत्र स्वत:लाच लिहिले आहे. त्याने आपल्या ट्विटला १५ वर्षांच्या विराटलीला मी माझ्या जीवनाचा प्रवास सांगत आहे, असे कॅप्शन दिला आहे. त्याचबरोबरच स्वतः लिहिलेले एक पत्रही पोस्ट केले आहे. स्वप्नांचा पाठलाग तू कर, तुझ्या जीवनात चांगल्या संधी येतील, त्यांच्यासाठी कायम तयार रहा, जीवनाचा प्रवास रोमांचकारी असून प्रत्येक अपयश आणि संधीमधून तुला शिकायला मिळेल. कुटुंबावर प्रेम करत रहा. स्वतःला उंच झेप घेण्याचे आश्वासन दे, त्यासाठी कायम प्रयत्न करत रहा, असे त्याने पत्रात लिहले आहे.

५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात विराट कोहलीचा जन्म झाला. विराटचे चीकू हे टोपणनाव आहे. भारतीय सघांत विराटला संधी रणजी सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने मिळाल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचा खेळ प्रत्येक सामन्यामध्ये सुधारतच गेला. कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना सर्वांत जास्त द्विशतके करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. तर कसोटीत त्याने ७ हजार धावा पूर्ण केल्या. तर एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावे आहे.


विराटला माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील वाढदिवसाच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहे. विराट कोहली, सचिन तेंडूलकर आणि सेहवाग बरोबर चर्चा करताना एका जुना फोटो आहे. तसेच ‘बादलों की तरह छाये रहो, हमेशा खुश रहो’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment