चक्क वाळत घातलेल्या कपड्यांपासून त्यांनी तयार केली वीज

आयआयटी खडगपूरच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या संशोधकांनी उन्हात वाळण्यासाठी घातलेल्या ओल्या कपड्यांद्वारे वीज निर्माण करण्यात यश मिळवले आहे. हा प्रयोग धोबी घाटावर 30 वर्गमीटर क्षेत्रात सुकत असलेल्या 50 कपड्यांवर केला. या पुर्ण प्रक्रियेसाठी संशोधकांना 24 तास लागले. यावेळी 1 व्हाइट एलईडी 1 तास जळण्यासाठी 10 वोल्ट वीज तयार झाली.

प्रोफेसर सुमन चक्रबर्ती म्हणाले की, ही वीज मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी फायदेशीर नाही, मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात यामुळे बदल घडू शकतो.

एक अन्य पीएचडी रिसर्च स्कॉलर शंख शुव्रा दास यांच्यानुसार, केवळ एका उपकरणाद्वारे 600 ते 700 मिलीवॉल्ट वीज तयार केली. प्रयोगादरम्यान 40-50 डिव्हाईसला एकसोबत जोडून 12-13 वॉल्ट वीज तयार केली.

प्रोफेसर चक्रबर्ती म्हणाले की, कपड्यांची धाग्यांची बनावट खूप मजबूत असते. कपड्याती सॅल्यूलोज फायबर एकप्रकारचे चार्ज उत्पन्न करते. याला मिठात टाकल्यावर ते फायबर होते. त्याद्वारे आयोनाइज तयार होते. आयोनाइज वेगात असल्याने त्याद्वारे करंट निर्माण होतो. जेव्हा हे वॉल्टेज बाहेरील रजिस्टरद्वारे जोडले जाते. तेव्हा छोट्या स्तरावार वीज निर्माण होते.

Leave a Comment