सामोसा विकण्यासाठी सोडली गुगलची गडगंज पगाराची नोकरी !


आजच्या तरुणाईला गुगल कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्याला कोणी नाही म्हणणार नाही. तिथे काम करणाऱ्याला कर्मचा-याला लाखोत पगार, गाडी, बंगला सगळेच काही एकाच झटक्यात मिळते. तेव्हा अशी नोकरी कोण बरे सोडून देईल! पण भारतातील एका पठ्ठ्याने गुगलमधील आपल्या गडगंज पगाराला नाकारत स्वत:चा स्टार्ट अप बिझनेस सुरू केला आहे.

दोन वर्षांपूर्वी मुनफ कपाडियाने गुगलमधील नोकरी सोडली. त्याने आपल्या आईच्या मदतीने फूड स्टार्टअप बिझनेस सुरू केला. त्याने लोकांपर्यंत ‘बोहरी थाल’ ही आपली स्पेशल डिश पोहोचवली. मटन सामोसा, नरगीस कबाब, डब्बा गोश्त, कडी भात यासारख्या व्यंजनांनी परिपूर्ण असलेली मुनफची बोहरी थाल बघता बघता प्रसिद्ध झाली. भलेही गुगलची नोकरी गडगंज पगाराची होती, पण आपल्या आवडीचे काम करून जे सुख समाधान मिळत होते ते त्याच्यासाठी बहुमुल्य होते.

त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईची मदत घेतली म्हणूनच त्याने आपल्या फूड स्टार्ट अप बिझनेसला ‘मां के हाथ का खाना’ असे नाव दिले. सुरुवातीला तो ग्राहकांना ई-मेल्स आणि मेसेजवरूनच आमंत्रण द्यायचा. पण हळूहळू त्याच्या हातच्या मटण सामोस्यांची चव अनेकांना आवडू लागली. लोकांची मागणी वाढू लागली तसा आपला व्यवसाय अधिक वाढवण्याकडे मुनफने भर द्यायला सुरूवात केली.

Leave a Comment