चुकीच्या खात्यात पैसे जमा केल्यास त्वरित करा हे काम

देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपण मित्रांना, नातेवाईकांना अनेकदा मोबाईल, नेटबँकिंगद्वारे पैसे पाठवत असतो.  मात्र अनेकदा चुकीने दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात व काहीवेळेस समोरची व्यक्ती देखील पैसे परत न करता, पैसे वापरते. तर कधी कधी तुमच्या खात्यातून नकळत पैसे काढले जातात. या समस्येपासून वाचण्यापासून काय केले पाहिजे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रिपोर्टनुसार, 2017-18 या एका वर्षात जवळपास 2,069 ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनुसार, जर तुमच्या परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढले असेल, तर तीन दिवसांच्या आत बँकेला या घटनेची माहिती द्या. यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.

या तक्रारीनंतर बँक चौकशी करेल की, तुमचे पैसे चुकीने दुसऱ्याच्या खात्यात तर नाही गेले किंवा कोणी खात्यातून पैसे तर काढले नाहीत. तपासणी केल्यानंतर बँक तुम्हाला तुमचे पुर्ण पैसे परत देईल. मात्र यासाठी तुम्हाला काही अटी पाळाव्या लागतील.

पैसे परत मिळविण्यासाठी तुम्हाला एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग सेवा बंद करावी लागेल. त्यानंतर पोलिसात याची तक्रार नोंदवा व एफआयआरची कॉपी बँकेत जमा करा.

बँक एफआयआर अंतर्गत पैशांची चौकशी करेल. जर तुमच्यासोबत कोणताही फ्रॉड झाला असेल, तर तुम्हाला पैसे परत मिळतील. मात्र जर तुमच्या खात्यातून चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले तर पैसे परत मिळतील की नाही हे बँकेवर निर्भर असते. मात्र पुरावा दिल्यास तुम्हाला पैसे परत मिळू शकतील. मात्र यासाठी तुम्हाला बँकेत त्वरित माहिती द्यावी लागेल.

Leave a Comment