खड्डे भरण्यासाठी पहिल्यादांच तयार करण्यात आली मशीन

देशात मागील एक वर्षात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 9 हजारांपेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये जवळपास साडेतीन हजार लोकांचे प्राण गेले आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी सेंट्रल रोड रिसर्च इंस्टिट्यूटने (सीआरआरआय) मशीन तयार केली आहे. या मशीनच्या मदतीने आधीच्या तुलनेत 5 पट वेगाने खड्डे भरले जातील. सीआरआरआयने पहिल्यांदाच हे तंत्र विकसित करून त्याचे पेटंट केले आहे. याचा जेसीबीमध्ये वापर केला जाईल.

सीआरआआयच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात मशीनचे प्रदर्शन होते. सीआरआरआयचे संचालक सतीश चंद्रा यांनी सांगितले की, पुढील वर्षी एप्रिलपासून मशीनची विक्री सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 500 मशीन तयार करण्याचे लक्ष्य आहे. याची किंमत नंतर सांगितली जाईल. या मशीनचा पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिकांना अधिक फायदा होईल. आतापर्यंत मॅन्युअल खड्डे भरले जात होते. ज्यासाठी मशीन आणि 6-7 जणांची टीम दिवसभरात 25 खड्डे भरत असे. मात्र मशीनद्वारे 2 लोक दिवसभरात 100 खड्डे भरू शकतील.

मशीन चालवण्यासाठी 2 लोकांची गरज आहे. एक मशीन ऑपरेट करणारा आणि दुसरा मशीनला गाईड करणारा असेल. ही मशीन रोलर, कटर आणि मिक्स्चर हे तिन्ही काम करेल.

 

Leave a Comment