बाबो ! 91 वर्षांचे आजोबा दररोज धावतात 5 किलोमीटर

विचार करा, तुम्ही 91 वर्षांचे व्हाल तेव्हा काय करत असाल ? कदाचित आजाराच्या गोळ्या घेत असाल आणि काठीच्या साहय्याने चालत असाल. मात्र एक 91 वर्षांचे आजोबा या वयातही दररोज 5 किलोमीटर धावतात. या आजोबांचे नाव एनएस दत्तात्रय आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांनी रन फॉर युनिटीमध्ये सहभागी होत 5 किलोमीटर अंतर पुर्ण केले होते.

आयपीएस ऑफिसर ईशा पंत यांनी ट्विटरवर त्यांचा फोटो शेअर केला. त्यांनी ट्विट केली की, 91 वर्षांच्या तरूणाबरोबर धावण्याची संधी मिळाल्याने मी खूष आहे.

या आजोबांना मॅरोथन आणि वॉकथॉनची आवड आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच त्यांनी आपला मुलगा मुरलीला अधिकाधिक मॅरोथॉनमध्ये भाग घेण्यास सांगितले. तेव्हापासूनच दोघेही जण सकाळी 5 किलोमीटर धावण्यास निघतात.

आजोबा स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचे. त्यांना निवृत्त होऊन आता 30 वर्ष झाली आहेत. शाळेत असताना ते व्हॉलीबॉल टीमचा भाग होते. आता पुन्हा एकदा धावण्यासाठी ते मैदानात उतरतात.

आजोबांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये 50 मेडल आणि 10 ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यांच्यासाठी 5 किलोमीटर धावणे आता एकदम साधी गोष्ट झाली आहे.

 

Leave a Comment