भारतीय वैज्ञानिकांनी बनविली थ्री डी त्वचा

भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील एका टीमने रक्त वाहिका असणारी 3डी त्वचा तयार करण्याची पध्दत विकसित केली आहे. हे नैसर्गिक त्वचा बनविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे.

3डी बायोमॅट्रिकद्वारे त्वचा तयार करण्यासाठी पेशी, वाढचे घटक आणि जैव साम्रगीला एकत्र करण्यात आले आहे. अमेरिकेच्या रेनेस्सेलाएर पॉलीटेक्निक इंस्टीट्यूटचे असोसिएट प्रोफेसर पंकज करांदे यांनी सांगितले की, ही त्वचा सजीव त्वचेच्या अगदी जवळ आहे. बायोमॅट्रिकच्या क्षेत्रात हा महत्त्वपुर्ण शोध आहे.

बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन शरीरावर लावल्यानंतर निघून जातात. ते शरीराबरोबर जोडले जात नाही. मात्र या नवीन शोधात बल्ड वॅसेल्स असल्याने हे शरीराबरोबर अगदी सहज जोडले जाते.

टिश्यू इंजिनिअरिंग पार्ट ए मध्ये छापलेल्या या संशोधनानुसार, स्किल ग्राफ्टमध्ये लावल्यानंतर शरीरातील रक्ताद्वारे पोषक तत्वाचा प्रवाह त्वचेत होत नाही. मात्र या नवीन त्वचेत रक्ताचा प्रवाह शक्य आहे. त्यामुळे ही त्वचा जिंवत राहते. या त्वचेचे परिक्षण उंदरांवर देखील करण्यात आले आहे.

करांदे यांनी सांगितले की, आगीमुळे झालेल्या जख्माेवर ही त्वचा खूपच फायदेशीर ठरेल.

 

Leave a Comment